मुख्य संपादक… सिद्धार्थ रणधीर
दौंड तालुक्यातील केडगाव येथील रेशनिंग धान्य गोदाम येथुन तालुक्यातील अनेक स्वस्त धान्य दुकान येथे शासनाकडून देण्यात येणारा गरीब, गरजू लोकांना जो गहू, तांदूळ वाटला जातो तो, तो च माल येथील हमाल म्हणून कामावर रुजू असलेले कडेठाण ता, दौंड, जि, पुणे . येथील ईश्वर नराळे हे या गोदामातून जो माल बाहेर जातो त्याच्यात डल्ला मारत असल्याची माहिती गुप्त तक्रारदार यांनी दिली असून, ते धान्य म्हणजे रेशनिंग चा माल हा कडेठाण येथील रेशनिंग दुकानदार आणि ईश्वर नराळे यांच्या दोघांच्या संगनमताने चोरी करून तो गोरगरिबांच्या तोंडातून काढून स्वतःचे घर भरण्यासाठी, केडगाव येथील मोठ्या व्यापाऱ्यांना हा रेशनिंग चा माल जास्त पैशांनी विकून शासनाची खूप मोठी फसवणूक करून चोरी केली जात आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या तक्रारीत असे म्हटले आहे की, हमाल म्हणून काम करणारा ईश्वर नराळे यांची मालमत्ता, बँक स्टेटमेंट तपासून पाहावे असा लेखी अर्ज इन्कम टॅक्स ऑफिस यांना देऊन जर येत्या 8 दिवसात या रेशनिंग चोरांवर कार्यवाही नाहि झाली तर तक्रारदार हे तहसील कार्यालयात दौंड येथे आमरण उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी स्पष्ट म्हटले आहे