मुख्य संपादक. सिद्धार्थ रणधीर 9511999282
दौंड तालुक्यातील कडेठाण येथील गावातील उपसरपंच आणि तरुण कार्यकर्ते यांनी स्मशानभूमी येथे होणारा सा वडण्याच्या विधिची राख ही नदीच्या पाण्यात न सोडता त्या ठिकाणी एक खड्डा खोदून त्यात राख टाकुन एक वृक्ष लावावे असा उपक्रम सुरु केला आहे.व तेथे लावलेले वृक्ष मोठे करणे हा मुख्य हेतू असल्याचे सांगण्यात आले आहे. या उपक्रमाची सुरुवात कै: लता बबन धावडे, पोपट निवृत्ती धावडे, लक्ष्मीबाई महादेव दिवेकर यांच्या सावडण्याच्या विधी पासून हा उपक्रम चालू करून वड, चिंच, गुलमोहर अशी वृक्ष या ठिकाणी लावण्यात आली आहेत