भारतीय रेल्वेमध्ये वंदे भारत एस्कप्रेसने क्रांती आणली आहे. पंतप्रधान मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या वंदे भारत एस्कप्रेसने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आहे. भारतातील प्रमूख मार्गांवर आता ही रेल्वे धावू लागली आहे. आता याचा पुढील टप्पा म्हणजे वंदे भारतची स्लिपर रेल्वे.
डिसेंबरमध्ये सुरु होणार होती ट्रेन
लांब पल्ल्याच्या मार्गावर या रेल्वे सुरु झाल्यास प्रवाशांना याचा चांगला लाभ होऊ शकतो. चांगल्या दर्जाच्या सेवा या रेल्वेमधून मिळतात. त्यामुळे या स्लिपर वंदे भारत ट्रेनला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. पण सध्या आलेल्या माहितीनुसार ही रेल्वे सुरु होण्यास विलंब लागू शकतो. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्वीन वैष्णव यांनी सप्टेबर महिन्यात या स्लिपर वंदे भारतचे प्रथम दर्शन घडविले होते. त्यावेळी डिसेंबरमध्ये ही रेल्वे सुरु होणार अशी घोषणा त्यांनी केली होती.
पहिली रेल्वे तयार पण
भारतीय रेल्वेने डिसेंबर २०२४ पर्यंत स्लिपर वंदे भारत सुरु करण्याचे लक्ष्य ठेवले होते. पण काही तांत्रिक अडचणी समोर आल्या असल्याने या रेल्वे सुरु होण्यास वेळ लागू शकतो. ही रेल्वे तयार करण्याचे काम भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड ही कंपनी करत आहे. या कंपनीकडूनच वंदे भारत ट्रेन तयार केली आहे. आत ही कंपनी स्लिपर वंदे भारत तयार करत आहे. या कंपनीने बंगरुळ येथील कारखान्यात पहिली रेल्वे तयार केली आहे. पण क्वालिटीमध्ये काही अडचणी आल्याचे समोर आले आहे.
या आहेत कमतरता
चेन्नईस्थित इंटीग्रल कोच फॅक्टरी च्या अधिकाऱ्यांनी या ट्रेनची पाहणी केली. त्यांनी सादर केलेल्या अहवालात काही त्रुटी आढळल्या आहेत. यामध्ये इंटर्नल पॅनेलमध्ये अंतर असून यामध्ये झुरळांसारखे किटक लपून बसू शकतात, याचा प्रवाशांना त्रास होऊ शकतो. साइड व लोअर बर्थ चे फंक्शन योग्य होत नाही. त्याचबरोबर टॉयलेटमध्ये लिकेज आढळले आहेत. कुशनही योग्य पद्धतीने झालेले नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुधारणा करण्याचे या अधिकाऱ्यांनी सुचविले आहे. या सुधारणा होण्यास वेळ लागणार असल्याने ही ट्रेन सुरु होण्यास पुढील वर्ष उजाडणार आहे.
नवीन तयार होत असलेली स्लिपर वंदे भारत ही १६ डब्यांची असणार आहे. यामध्ये फर्स्ट एसीचा १ कोच, सेंकडं एसीचे ४ कोच व थर्ड एसीचे ११ कोच असणार आहेत. या सर्वांमध्ये ८२३ बर्थ असणार आहेत.