मुख्य संपादक… सिद्धार्थ रणधीर
मौजे हातवळण येथील हॉटेल जय तुळजाभवानी येथे खुलेआम दारू विक्री जोमात चालू असून,या दारू विक्री बद्दल गेली काही महिन्यापासून तक्रारदार यांनी तहसीलदार सो दौंड यांच्या कडे लेखी तक्रार करून अद्याप या हॉटेल मधील दारू विक्री थांबलेली नाही. या दारू विक्री मुळे येथे मोठं मोठे वाद देखील या ठिकाणी झालेले आहेत. अशी परिस्तिथी असताना उद्या यातून काही विपरीत प्रकार घडला नाही म्हणजे झाल. संबंधित हॉटेल वर पोलिसांनी छापा टाकून या हॉटेल चालकावर योग्य ती कार्यवाही करून दारू विक्री त्वरित बंद करावी. अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत