मुख्य संपादक. सिद्धार्थ रणधीर
दौंड तालुक्यातील कडेठाण येथे मातीचे उत्खनन मोठ्या प्रमाणात चालू असून. या माती उत्खननामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रस्त्याचे खची करण देखील होत आहे. या माती उपशा मुळे गावात दोन गटात वाद अनेक वेळा होऊन याला वेगळे वळण लागून एखाद्याचा जीव जातो कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तक्रारदार यांनी महसूल ला वारंवार लेखी तक्रार करून काहीच फायदा होत नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.